20
Jan
"पाहुणा" मांजर
मांजर हा विषय असा आहे कि कितीही लिहिले तरी कमीच..आणि खरे तर मला ब्लॉगवर काही तरी लिहायचे असले कि मला मांजराशिवाय काहीच सुचत नाही. आमच्याकडे लाखो मांजरे आली आणि गेली आणि हरवलीसुद्धा. काहीना सोडले सुद्धा.
एक असंच अविस्मरणीय मांजर होते. ३-४ दिवसच होते पण चांगलेच लक्षात राहिले आहे. एकदा रात्री अचानक आमच्या मागच्या घरातून मांजराचा आवाज यायला लागला.आम्हाला वाटले आधी आमचेच आहे मांजर. म्हणून पहिले तर नव्हते मग दिसले कि एक छोटे पिल्लू आहे आणि त्याला चालता येत नाही आहे. आता अश्या मांजराकडे दुर्लक्ष तरी कसे करणार. मग त्याला आम्ही आमच्याकडे आणले. त्याचे मागचे पाय paralyzed झाले होते. त्याला चालता येत नव्हते. तो सरकत सरकत चालत होता. पण तरीही त्याच्यात भयंकर उत्साह होता आणि अश्या कठीण प्रसंगी अजून एक गोष्ट म्हणजे माझ्या final viva होत्या. अभ्यासाची वाट लागली होती माझ्या. मी आणि आई त्या मांजराला घेऊन डॉक्टरकडे गेलो . डॉक्टर म्हणाले त्याची kidney मध्ये काही तरी प्रोब्लेम आहे. तरी त्यांनी काही तरी औषध दिले. मी कसा बसा अभ्यास केला. अपेक्षे प्रमाणे घाण गेली viva , पण पास झाले. मग दुसऱ्या दिवशी माझा एक मित्र आहे क्षितीज , जो सर्पोद्यानात स्वयंसेवक म्हणून काम करतो. त्याला मी विचारले कि "अनाथालय आहे का पाळीवप्राण्यांचे? "त्या मांजराला घरी ठेवणे शक्य नव्हते कारण घरी बोंबाबोंब सुरु झाली होती कारण ते मांजर घाण करत होत . त्यामुळे खूप वाईट वाटत असूनही मला त्याला कुठे तरी सोडावे लागणार होते. मग त्याने एक अनाथालय सांगितले. त्याच दुपारी बाबा घरी नसताना आईने मला ५०० रुपये दिले आणि मी आणि क्षितीज दोघेही त्या मांजराला घेऊन अनाथालयात गेलो. पण तिकडे अजूनच वाईट परिस्थिती होती. एक तर सरकारी होते ते. तुम्ही विचार करू शकता काय असेल ते आणि एका मोठ्या पिंजरयात १०-१५ मांजरे ठेवली होती. वाघ जसा पिंजऱ्यात येरझारा घालतो तशी ती मांजरे करत होती. ते पाहून तर मला खूपच वाईट वाटले. असे वाटले त्यापेक्षा त्याला गोळ्या द्याव्यात आणि....तिथल्या डॉक्टर ने त्याला तपासले आणि सांगितले कि कठीण आहे तो नाही जास्ती जगू शकत.. मग त्यांनी थोडी काळजी घ्यावी त्या मांजराची म्हणून आम्ही देणगी दिली. माझ्या बाबांना अजूनही ते माहित नसेल कदाचित..असली कामे बाबा ऑफिसला गेलेकीच चालायची. अनाथालयातून निघताना भयंकर रडू आले. कारण तिकडे त्याचे काय करणार माहित नव्हते. पण माझ्याकडे काही दुसरा पर्याय पण नव्हता. रस्त्यावर सोडण्यापेक्षा तो उपाय बराच चांगला होता. नंतर २दिवस मला सारखे वाटत होते कि आपण चूक केली त्याला तिकडे सोडून. ३ ऱ्या दिवशी अनाथालयातून फोन आला..कि "आपकी cat कि death हो गायी.." . एका अर्थी बरे वाटले कि ते मांजर त्रासातून सुटले..वाईट पण वाटले..आणि आज पण लिहिताना वाटते आहे.
This entry was posted
on Wednesday, January 20, 2010
at Wednesday, January 20, 2010
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.