मेथीची भाजी  

Posted by वृषाली

आज खूप दिवसांनी मी मेथीची भाजी आणि पालकाची ताकातली भाजी खाल्ली. आता लोकांना असा प्रश्न पडेल कि त्यात इतका आनंद का झाला हिला? आमच्याकडे मेथी हि फक्त गुरुवारीच मिळते. इतर दिवशी खूप क्वचित "भाग्य " असेल तर मेथी मिळते. मी आज बरोबर १ वर्षाने मेथीची भाजी खाल्ली म्हणून हा मला इतका आनंद झाला आहे. मागच्या वर्षी भारत भेटीत शेवटची मेथी खाल्ली होती.
मागच्या शनिवारी मी भाजी आणायला गेले होते. शनिवार होता त्यामुळे मेथी असेल असे अजिबात वाटले नाही आणि मेथी दिसली. इतका आनंद झाला. माझी एक मैत्रीण आहे तिने मला आधीच सांगून ठेवले होते कि मेथी दिसली तर माझ्यासाठी घेऊन ठेव. लगेच तिला फोने केला. तिला पण शनिवारी मेथी आहे हे एकून आश्चर्य वाटले आणि ३-४ जुड्या घेऊन ठेव असे सांगितले.
कधी भारतात असताना मेथी असो-नसो कधीच काही वाटले नाही..पण अमेरिकेत आल्यापासून मेथीची पण आठवण येते.
आज खूप दिवसांनी गरम गरम पोळ्या पण खाल्ल्या. गरम फुलक्या ,मेथीची भाजी, ताकातली दाणे घालून केलेली पालक भाजी. व्हा व्हा !! आत्मा तृप्त झाला आज आमचा!!(सचिन आणि मी)
माझा आनंद व्यक्त करायचा होता . म्हणून हा ब्लॉग. फेसबुक वर स्टेटस लिहिणार होते पण तिथली जागा कमी पडली असती मला.

"Drive-In" सिनेमा  

Posted by वृषाली in , ,

प्रेमी-युगुलांसाथी १४ फेब्रुअरी म्हणजे खूप "महत्वाचा" दिवस असतो. आपण पण तो साजरा करायला लागतो आहोत. (शिवसेनाचा विरोध असला तरीही !!!)
लग्नानंतर हा आमचा(माझा आणि सचिनचा) पहिला एकत्र "valentine" दिवस होता. मला अभ्यास होता पण मी सकाळी लायब्ररीमध्ये गेले,अभ्यास केला आणि मग संध्याकाळी "drive- in" सिनेमा पाहायला जायचे असे ठरवले.
"drive- in " फूड मिळते हे माहित होते पण सिनेमा पण असतो हे माझ्यासाठी नवीन होते. आम्ही संध्याकाळी आवरून-बिवरून निघालो. कॅम्प खुर्च्या, खायचे,प्यायचे(फक्त सोफ्ट ड्रिंक्स :P) घेतले. तिकडे गेल्यावर आधी एका मोठ्या ticket लाइन मध्ये उभे राहावे लागले.म्हणजे कार मधेच पण लाइन मध्ये. तिकडे वेगवेगळे ऑपसन होते . एका ticket मध्ये तुम्ही २ सिनेमा पाहू शकता . आम्ही "valentine 's day " आणि "when in rome" हे सिनेमा पहायचे ठरवले. ticket मिळाले आणि त्यांनी आम्हाला एक radio frequency सांगितली .
"drive
- in "
सिनेमा म्हणजे काय ?? एक मोठे पटांगण असते तिकडे - वेगवेगळे भाग केलेले असतात . प्रत्येकभागात वेगवेगळे सिनेमा दाखवतात. आपण जे सिनेमाची tickets घेतली त्या भागात आपण जायचे आणि कारपार्क करायची. समोर मोठा स्क्रीन असतो . तिकडे तुम्हाला सिनेमा दिसतो आणि जी radio frequency दिलेलीअसते तिथे तुम्हाला संभासन ऐकू येतात. कसले भारी ना!! वेगळाच अनुभव.
आम्ही आमची कार पार्क केली आणि मस्त कॅम्प खुर्च्या टाकल्या. आम्ही छोटे टेबल पण नेले होते. त्याच्यावरसगळे खायचे प्यायचे ठेवले आणि मस्त खात बसलो. खूप गर्दीमुले सिनेमा उशिरा सुरु होणार होता . गर्दी कमीझाल्यावर एकदाचा सिनेमा सुरु झाला. बाहेर बसून सिनेमा पाहण्यात काही वेगळाच आनंद असतो. पण तो आनंदजास्ती वेळ नाही टिकला कारण थंडी मुले आम्ही बाहेर नाही बसू शकलो.कार मध्ये जाऊन बसावे लागले. ज्यालोकांच्या trucks होते (अमेरिकेतले truck म्हणजे भारतातले टेम्पो जे मागे उघडे असतात. टेम्पो हा खुपच गरीबशब्द आहे पण आयडिया येन्यासाठी वापरला.) ते मस्त truck च्या मागे पांघरुणे टाकून झोपली होती. पहिलासिनेमा बरा होता पण दुसरा खूपच असह्य झाला मग आम्ही निघून आलो.

प्राणीभेद  

Posted by वृषाली in

मी नेहमी म्हणत असते मला प्राणी आवडतात . मांजर तर जीवापाड आवडते. पण मी जेव्हा विचार करते कि कि मी एके ठिकाणी म्हणते मला प्राणी आवडतात आणि दुसरी कडे मी तर chicken खाते. म्हणजे माझे प्राणी प्रेम मी माझ्या सोयीनुसार करते. किती चुकीचे आहे हे !!!!

मला माझी एक मामी आठवली. ती खरच प्राणी प्रेमी आहे. ती कधीच non -veg नाही खात, इतकेच नाही तर ती एक बालाजीचे मंदिर आहे पुण्याजवळ तिकडे पण जात नाही कारण ते ज्यांनी बांधले आहे ते chicken विकतात. आणि तिचे म्हणणे आहे कि कोंबड्या मारूनच त्यांनी पैसे कमावले आहेत आणि मंदिर बांधले आहे . किती बरोबर विचार आहेत हे.

भारतामध्ये मी कधी इतके non - veg नव्हते खात.पण अमेरिकेत आल्यापासून ते खूपच वाढले आहे . त्याचे कारण आहे कि veg लोकांसाठी खूप कमी options असतात. एकदा आम्ही एका विमानतळावर २-३ तास बसलो होतो. flight delay झाला होता. रात्रीचे १० वाजले होते. सगळी दुकाने बंद झाली होती. तिकडे एकच दुकान उघडे होते आणि तिथे फक्त केळी हा एकाच option होता veggie लोकांसाठी आणि मला रात्रभर फक्त केळ्यांवर राहायला लागले. तेव्हापासून मी ठरवले आता सगळे खायला सुरवात करायची, नाही तर असाच हाल होणार बाहेर फिरायला गेले कि. इकडे बरच लोक आहेत जे अजिबात non -veg ला हात नाही लावत. मग मी का असा विचार केला ?? कारण माझा स्वार्थ !!! मी जर नाही खाल्ले तर मला चांगले जेवायला नाही मिळणार बाहेर!!!

अमेरिकेत पण खूप प्राणी प्रेम आहे असे म्हणतात.पण तेच(कदाचित) सगळ्यात जास्ती non -veg खातात. प्राणी अनाथालये आहेत जिथे प्राण्यांचे जीव वाचवले जातात..म्हणजे ते मांजर किंवा कुत्रा यांचा जीव वाचवतात .पण एकीकडे ते लोक कोंबडी अथवा अजून कोणता तरी प्राणी मारून खातात???? खरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

मला तुम्हा वाचकांचा या बद्दलचे मत नक्कीच वाचायला आवडेल.