Jokes  

Posted by वृषाली in






एकदा एक पोपट उड्ता उडता ट्रकला धडकतो आणि बेशूध्द होतो. ट्रक ड्राइवर पोपटाला घरी आणून पिंजरात ठेवतो. २ तासांनी पोपटला शूध्द
येते. आणि स्वत:ला पिंजरात पाहून पोपट म्हणतो 'आयला मी तुरुगात? ट्रक ड्राइवर मेला की काय?'

------------------------------------------------------------------------------------------------

एकदा साप,कोंबडी,मांजर आणि शंभर पायाची गोम पत्ते खेळत बसले असतात.. पत्ते खेळता खेळता सगळ्यांना कॉफी प्यायची इच्छा होते, पण घरात कॉफीच नसते.. मग साप कोंबडीला म्हणतो, मला पायच नाहीयेत, तू पटकन जाऊन घेऊन ये ना..
कोंबडी म्हणते मला दोनच पाय आहेत, ही मांजर जाईल की..
मांजर म्हणते, मला बाई चारच पाय.. ही काय गोम बसलीय, ती जाईल..चांगले १०० पाय आहेत तिला!!
ती काय बोलणार.. जाते आपली.. पण जाऊन तास दिड तास होतो तरी कॉफीचा पत्ता नाही ! शेवटी सगळे कंटाळून तिला शोधायला निघतात, तर ही आपली बसलीय जिन्यात !!
मांजर चिडून म्हणते, तू अजून इथेच बसलीयेस?? कॉफी आण्णार होतीस ना?
गोम पण चिडून म्हणाते...

" बसले नाहीय नुस्ती !! दिसत नाहीये का चपला घालतीये पायात !! "


-------------------------------------------------------------------------------------------------

औफिसमध्ये साहेबांच्या निरोपसमारंभ ... लिनाबाई समारंभाचं भाष्ण करायला आल्या....
"साहेबांच्या हाताखाली काम करता करता दिवस कसे गेले ते कळलंच नाही"
.... आणि सभाग्रहात जोरदार हशा ...!

-------------------------------------------------------------------------------------------------

पोलिस - दारुड्यासः ईथे का उभा आहेस?
दारुड्या - तोल सांभाळीतः यावेळी सारे शहर माझ्याभोवती फीरत आहे. माझे घर आले की मी घरात घुसेन ..!

-------------------------------------------------------------------------------------------------

तुफान पाऊस पडतोय..
तुला वाटत असेल, छान बाहेर पडावं...
भिजुन चिंब होत, पाणी उडवत, गाणं गाताना...
कुणीतरी खास भेटावं ...!
हो ना?


... अरे हो म्हण ना..! लाजायचं काय त्यात..?
प्रत्येक बेडकाला असंच वाटत पावसांत...!

-------------------------------------------------------------------------------------------------

संताला बंताने विचारले, 'तुला जेव्हा जाम उकडतं, तेव्हा तू काय करतोस?'

संता म्हणाला, 'सिंपल... कुलरसमोर जाऊन बसतो.'

बंतानं विचारलं, 'तरीही उकडायचं थांबलं नाही, तर काय करतोस?'

संता म्हणाला, 'व्हेरी सिंपल, कुलर ऑन करतो!!!!'

------------------------------------------------------------------------------------------------

पक्या पेताडने मध्यरात्र उलटून गेल्यावर झुलत झुलत आपल्या घराचे दार वाजवले. त्याच्या बायकोने दार उघडले. तिला पाहून तो म्हणाला, 'आपण कोण आहात मॅडम?'

ती फणकाऱ्याने म्हणाली, 'आता तुम्हाला तुमच्या बायकोचाही विसर पडला वाटतं.'

पक्या म्हणाला, 'दारू सगळ्या दु:खांचा विसर पाडते म्हणतात ते खोटं नाही!!!!

------------------------------------------------------------------------------------------------

अनुपम खेर ला वर्षाअखेर मुलगी झाली........तिचे नाव काय असेल????????

think

think

Ans. वर्षा अ.खेर

-------------------------------------------------------------------------------------------------

एक माणूस दूध पिता पिता मरतो........कसे काय????????

Think

think

Ans. सिंपल आहे.........म्हॆस खाली बसते.....

आमचा काळू  

Posted by वृषाली in ,


मला लहानपानापासूनच मांजरे फार आवडतात..ती आवड आईचीच आली आहे. माझ्या आजोबांना आवडायची नाहीत मांजरे ,मला म्हणायचे कि पाठीवर घेऊन फिरत जा....
माझे लग्न झाले आणि योगायोगाने माझ्या सासरचे "मांजर वेडे" निघाले..दोन्ही घरात मांजरांच्या histories आहेत. इथे मी सध्या एका प्राण्यांच्या अनाथालायत स्वयंसेवक म्हणून जाते आहे. तिथे भरपूर मांजरे भेटतात. एका वेळी २०-२५ मांजरे..म्हणजे माझी दिवाळीच होते :)
तिथून आम्ही एक मांजर घरी आणले आहे..पूर्ण काळ्या रंगाचे आहे . म्हणून आम्ही त्याला "काळू" असे नाव दिले आहे. पूर्ण काळा आणि हिरवे डोळे. पहिल्यांना पाहिल्यावर थोडा आगाऊ वाटतो.पण आता १ महिना त्याच्याबरोबर राहिल्यावर कळले मला कि तो आगाऊ नाही आहे.एकदम प्रेमळ आहे.थोडा सुधा त्याला त्याच्या सौंदर्याचा गर्व नाही.चालताना मस्त ऐटीत चालतो.त्याची शेपटी नेहमीच वरती असते,आम्ही त्याला झेंडा म्हणतो.तो इतका अवाढव्य हे कि बस.. तुम्ही फोटो पहालच त्याचा :)
तो आल्यापासून मला मस्त सोबत मिळाली आहे. दिवसभर माझ्याबरोबर असतो.मी जिथे जाइन तिथे तो येतो.सकाळी उशिरा उठले तरी माझ्या शेजारी शांतपणे झोपून राहतो.कधी कधी भूक असह्य झाली तर उठवतो. नाही तर मी उठले कि मला मस्त good morning करतो,मला अंग घासून. मग आधी त्याला खायला द्यायचे नाही तर तुम्हाला तुमचे एक काम नाही करून देणार..त्याला खायला द्यायचे आणि मग आपली कामे करायची. मग खाउन झाले कि बाल्कनी जवळ जाऊन ओरडत राहतो. कारण सकाळ आणि संध्याकाळी त्याची ठरलेली वेळ असते..बाल्कनीमध्ये timepass करायची. मस्त बसतो बाल्कनीमध्ये आणि टेहळणी करतो.तो बाहेर असताना बाल्कनीचे दार नाही लावायचे...त्याला खूप insecure वाटते. मग थोडा वेळ बसतो आणि उन्ह वाढायला लागले कि बरोबर आत येतो..आधीच काळा आणि जाड केस..किती उकडत असेल बिचाऱ्याला. कधी कधी त्याला मनात नसताना आत आणले कि खूप चिडतो. जोरात आत चालत येतो आणि टेबलवर जोरात उडी मारून पसरतो आणि मी चिडलो आहे असे दाखवतो. भारतात होते तेव्हा बरीच मांजरे पहिली पण अश्या भावना असेलेल मांजर पहिल्यांदाच पाहते आहे. खूप मूडी पण आहे.मूड असेल तर खेळणार,लाड करून घेणार नाही.तो जेव्हा झोपलेला असतो तेव्हा त्याला हात लावायचा कि इतका गोड ओरडतो आणि म्हणतो "मी झोपलो आहे ना दिसत नाही ". अगदी माणसासारखा झोपलेला असतो रात्रभर.
तो खूप famous पण झाला आहे. मला सगळ्या मैत्रिणी विचारतात काळू कसा आहे ? मला bye करताना न विसरता त्याला पण bye करतात.
कधी कधी विचार करते lucky मांजर आहे. आमच्या इथे एक संस्था आहे . तिथे खूप मांजरे रोज सोडली जातात आणि ते लोक २४ तास वाट पाहतात आणि त्यांना मारून टाकतात.कारण त्याच्या कडे रोज शेकडोने मांजरे येतात. "Jan 09 to march 09 " या काळात ५१,००० मांजरे आणि कुत्री आली आहेत तिथे. तिकडूनच मी जिथे काम करते ती संस्था मांजरे आणतात. त्यांना "save from kiil list " म्हणतात. तर आमचा काळू पण तिथूनच आणला आहे मागच्या वर्षी. तिकडे तो एका छोट्या पिंजरा मध्ये बंद होता. विचार केला तरी वाईट वाटते.
तर असा हा आमचा काळू..फुल entertainment आहे. खूप प्रेमळ,गोड...