अजून एक नवल  

Posted by वृषाली

बऱ्याच लोकांना माहित नसेल..मांजरे लाडात आली कि खूप गुरगुरतात..म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा आवाज काढतात. आताच मी एक बातमी वाचली..एक ब्रिटीश मांजर आहे ती सगळ्यात मोठ्या आवाजात गुरगुरते असा त्याच्या मालकाचे म्हणणे आहे..आवाज ऐकायचा असेल तर इथे क्लिक करा..

'चोरट' मांजर  

Posted by वृषाली in

अमेरिकेतल्या एका गावी रोज चोर्‍या होत होत्या आणि त्या सुद्धा विचित्र. कधी टॉवेल कधी हातमोजे कधी लहान मुलांची खेळणी.
एक दिवस एका माणसाने ठरवले की आपण चोरून वीडियोशूटिंग करायचे आणि पाहायचे कोण ही चोरी करते आहे..वीडियो कॅमेरा लावण्यात आला. दुसर्‍या दिवशी जेव्हा तो वीडियो पाहण्यात आला तेव्हा सगळ्याना भयंकर नवल वाटले..कारण चोरी करणारे दुसरे तिसरे कोणी नसून..एक मांजर होते..
ते मांजर रोज रात्र झाली कि घराबाहेर पडायचे..ज्यांनी कोणी बाहेर त्यांच्या वस्तू ठेवल्या असतील त्या वस्तू घेऊन आणून मालकाच्या घरासमोर आणून ठेवायचे..मग ती वस्तू त्याच्या वजनापेक्षा जड पण असली तरी चालेल..किंवा आकारापेक्षा मोठी असली तरी चालेल आणि त्याचा मालकाला काही उपयोग नसला तरी चालेल..त्या मालकाने अगदी कौतुकाने..एक वेगळी खोली केली आहे आणि त्यात मांजराने चोरून आणलेल्या सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत..मांजराने आत्तापार्येंत ३ वर्षात ६०० गोष्टी चोरल्या आहेत..आहे कि नाही विचित्र मांजर..म्हणूनच मला आवडतात मांजरे.
video साठी इथे क्लिक करा

मेथीची भाजी  

Posted by वृषाली

आज खूप दिवसांनी मी मेथीची भाजी आणि पालकाची ताकातली भाजी खाल्ली. आता लोकांना असा प्रश्न पडेल कि त्यात इतका आनंद का झाला हिला? आमच्याकडे मेथी हि फक्त गुरुवारीच मिळते. इतर दिवशी खूप क्वचित "भाग्य " असेल तर मेथी मिळते. मी आज बरोबर १ वर्षाने मेथीची भाजी खाल्ली म्हणून हा मला इतका आनंद झाला आहे. मागच्या वर्षी भारत भेटीत शेवटची मेथी खाल्ली होती.
मागच्या शनिवारी मी भाजी आणायला गेले होते. शनिवार होता त्यामुळे मेथी असेल असे अजिबात वाटले नाही आणि मेथी दिसली. इतका आनंद झाला. माझी एक मैत्रीण आहे तिने मला आधीच सांगून ठेवले होते कि मेथी दिसली तर माझ्यासाठी घेऊन ठेव. लगेच तिला फोने केला. तिला पण शनिवारी मेथी आहे हे एकून आश्चर्य वाटले आणि ३-४ जुड्या घेऊन ठेव असे सांगितले.
कधी भारतात असताना मेथी असो-नसो कधीच काही वाटले नाही..पण अमेरिकेत आल्यापासून मेथीची पण आठवण येते.
आज खूप दिवसांनी गरम गरम पोळ्या पण खाल्ल्या. गरम फुलक्या ,मेथीची भाजी, ताकातली दाणे घालून केलेली पालक भाजी. व्हा व्हा !! आत्मा तृप्त झाला आज आमचा!!(सचिन आणि मी)
माझा आनंद व्यक्त करायचा होता . म्हणून हा ब्लॉग. फेसबुक वर स्टेटस लिहिणार होते पण तिथली जागा कमी पडली असती मला.

"Drive-In" सिनेमा  

Posted by वृषाली in , ,

प्रेमी-युगुलांसाथी १४ फेब्रुअरी म्हणजे खूप "महत्वाचा" दिवस असतो. आपण पण तो साजरा करायला लागतो आहोत. (शिवसेनाचा विरोध असला तरीही !!!)
लग्नानंतर हा आमचा(माझा आणि सचिनचा) पहिला एकत्र "valentine" दिवस होता. मला अभ्यास होता पण मी सकाळी लायब्ररीमध्ये गेले,अभ्यास केला आणि मग संध्याकाळी "drive- in" सिनेमा पाहायला जायचे असे ठरवले.
"drive- in " फूड मिळते हे माहित होते पण सिनेमा पण असतो हे माझ्यासाठी नवीन होते. आम्ही संध्याकाळी आवरून-बिवरून निघालो. कॅम्प खुर्च्या, खायचे,प्यायचे(फक्त सोफ्ट ड्रिंक्स :P) घेतले. तिकडे गेल्यावर आधी एका मोठ्या ticket लाइन मध्ये उभे राहावे लागले.म्हणजे कार मधेच पण लाइन मध्ये. तिकडे वेगवेगळे ऑपसन होते . एका ticket मध्ये तुम्ही २ सिनेमा पाहू शकता . आम्ही "valentine 's day " आणि "when in rome" हे सिनेमा पहायचे ठरवले. ticket मिळाले आणि त्यांनी आम्हाला एक radio frequency सांगितली .
"drive
- in "
सिनेमा म्हणजे काय ?? एक मोठे पटांगण असते तिकडे - वेगवेगळे भाग केलेले असतात . प्रत्येकभागात वेगवेगळे सिनेमा दाखवतात. आपण जे सिनेमाची tickets घेतली त्या भागात आपण जायचे आणि कारपार्क करायची. समोर मोठा स्क्रीन असतो . तिकडे तुम्हाला सिनेमा दिसतो आणि जी radio frequency दिलेलीअसते तिथे तुम्हाला संभासन ऐकू येतात. कसले भारी ना!! वेगळाच अनुभव.
आम्ही आमची कार पार्क केली आणि मस्त कॅम्प खुर्च्या टाकल्या. आम्ही छोटे टेबल पण नेले होते. त्याच्यावरसगळे खायचे प्यायचे ठेवले आणि मस्त खात बसलो. खूप गर्दीमुले सिनेमा उशिरा सुरु होणार होता . गर्दी कमीझाल्यावर एकदाचा सिनेमा सुरु झाला. बाहेर बसून सिनेमा पाहण्यात काही वेगळाच आनंद असतो. पण तो आनंदजास्ती वेळ नाही टिकला कारण थंडी मुले आम्ही बाहेर नाही बसू शकलो.कार मध्ये जाऊन बसावे लागले. ज्यालोकांच्या trucks होते (अमेरिकेतले truck म्हणजे भारतातले टेम्पो जे मागे उघडे असतात. टेम्पो हा खुपच गरीबशब्द आहे पण आयडिया येन्यासाठी वापरला.) ते मस्त truck च्या मागे पांघरुणे टाकून झोपली होती. पहिलासिनेमा बरा होता पण दुसरा खूपच असह्य झाला मग आम्ही निघून आलो.

प्राणीभेद  

Posted by वृषाली in

मी नेहमी म्हणत असते मला प्राणी आवडतात . मांजर तर जीवापाड आवडते. पण मी जेव्हा विचार करते कि कि मी एके ठिकाणी म्हणते मला प्राणी आवडतात आणि दुसरी कडे मी तर chicken खाते. म्हणजे माझे प्राणी प्रेम मी माझ्या सोयीनुसार करते. किती चुकीचे आहे हे !!!!

मला माझी एक मामी आठवली. ती खरच प्राणी प्रेमी आहे. ती कधीच non -veg नाही खात, इतकेच नाही तर ती एक बालाजीचे मंदिर आहे पुण्याजवळ तिकडे पण जात नाही कारण ते ज्यांनी बांधले आहे ते chicken विकतात. आणि तिचे म्हणणे आहे कि कोंबड्या मारूनच त्यांनी पैसे कमावले आहेत आणि मंदिर बांधले आहे . किती बरोबर विचार आहेत हे.

भारतामध्ये मी कधी इतके non - veg नव्हते खात.पण अमेरिकेत आल्यापासून ते खूपच वाढले आहे . त्याचे कारण आहे कि veg लोकांसाठी खूप कमी options असतात. एकदा आम्ही एका विमानतळावर २-३ तास बसलो होतो. flight delay झाला होता. रात्रीचे १० वाजले होते. सगळी दुकाने बंद झाली होती. तिकडे एकच दुकान उघडे होते आणि तिथे फक्त केळी हा एकाच option होता veggie लोकांसाठी आणि मला रात्रभर फक्त केळ्यांवर राहायला लागले. तेव्हापासून मी ठरवले आता सगळे खायला सुरवात करायची, नाही तर असाच हाल होणार बाहेर फिरायला गेले कि. इकडे बरच लोक आहेत जे अजिबात non -veg ला हात नाही लावत. मग मी का असा विचार केला ?? कारण माझा स्वार्थ !!! मी जर नाही खाल्ले तर मला चांगले जेवायला नाही मिळणार बाहेर!!!

अमेरिकेत पण खूप प्राणी प्रेम आहे असे म्हणतात.पण तेच(कदाचित) सगळ्यात जास्ती non -veg खातात. प्राणी अनाथालये आहेत जिथे प्राण्यांचे जीव वाचवले जातात..म्हणजे ते मांजर किंवा कुत्रा यांचा जीव वाचवतात .पण एकीकडे ते लोक कोंबडी अथवा अजून कोणता तरी प्राणी मारून खातात???? खरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

मला तुम्हा वाचकांचा या बद्दलचे मत नक्कीच वाचायला आवडेल.

"पाहुणा" मांजर  

Posted by वृषाली

मांजर हा विषय असा आहे कि कितीही लिहिले तरी कमीच..आणि खरे तर मला ब्लॉगवर काही तरी लिहायचे असले कि मला मांजराशिवाय काहीच सुचत नाही. आमच्याकडे लाखो मांजरे आली आणि गेली आणि हरवलीसुद्धा. काहीना सोडले सुद्धा.
एक असंच अविस्मरणीय मांजर होते. - दिवसच होते पण चांगलेच लक्षात राहिले आहे. एकदा रात्री अचानक आमच्या मागच्या घरातून मांजराचा आवाज यायला लागला.आम्हाला वाटले आधी आमचेच आहे मांजर. म्हणून पहिले तर नव्हते मग दिसले कि एक छोटे पिल्लू आहे आणि त्याला चालता येत नाही आहे. आता अश्या मांजराकडे दुर्लक्ष तरी कसे करणार. मग त्याला आम्ही आमच्याकडे आणले. त्याचे मागचे पाय paralyzed झाले होते. त्याला चालता येत नव्हते. तो सरकत सरकत चालत होता. पण तरीही त्याच्यात भयंकर उत्साह होता आणि अश्या कठीण प्रसंगी अजून एक गोष्ट म्हणजे माझ्या final viva होत्या. अभ्यासाची वाट लागली होती माझ्या. मी आणि आई त्या मांजराला घेऊन डॉक्टरकडे गेलो . डॉक्टर म्हणाले त्याची kidney मध्ये काही तरी प्रोब्लेम आहे. तरी त्यांनी काही तरी औषध दिले. मी कसा बसा अभ्यास केला. अपेक्षे प्रमाणे घाण गेली viva , पण पास झाले. मग दुसऱ्या दिवशी माझा एक मित्र आहे क्षितीज , जो सर्पोद्यानात स्वयंसेवक म्हणून काम करतो. त्याला मी विचारले कि "अनाथालय आहे का पाळीवप्राण्यांचे? "त्या मांजराला घरी ठेवणे शक्य नव्हते कारण घरी बोंबाबोंब सुरु झाली होती कारण ते मांजर घाण करत होत . त्यामुळे खूप वाईट वाटत असूनही मला त्याला कुठे तरी सोडावे लागणार होते. मग त्याने एक अनाथालय सांगितले. त्याच दुपारी बाबा घरी नसताना आईने मला ५०० रुपये दिले आणि मी आणि क्षितीज दोघेही त्या मांजराला घेऊन अनाथालयात गेलो. पण तिकडे अजूनच वाईट परिस्थिती होती. एक तर सरकारी होते ते. तुम्ही विचार करू शकता काय असेल ते आणि एका मोठ्या पिंजरयात १०-१५ मांजरे ठेवली होती. वाघ जसा पिंजऱ्यात येरझारा घालतो तशी ती मांजरे करत होती. ते पाहून तर मला खूपच वाईट वाटले. असे वाटले त्यापेक्षा त्याला गोळ्या द्याव्यात आणि....तिथल्या डॉक्टर ने त्याला तपासले आणि सांगितले कि कठीण आहे तो नाही जास्ती जगू शकत.. मग त्यांनी थोडी काळजी घ्यावी त्या मांजराची म्हणून आम्ही देणगी दिली. माझ्या बाबांना अजूनही ते माहित नसेल कदाचित..असली कामे बाबा ऑफिसला गेलेकीच चालायची. अनाथालयातून निघताना भयंकर रडू आले. कारण तिकडे त्याचे काय करणार माहित नव्हते. पण माझ्याकडे काही दुसरा पर्याय पण नव्हता. रस्त्यावर सोडण्यापेक्षा तो उपाय बराच चांगला होता. नंतर दिवस मला सारखे वाटत होते कि आपण चूक केली त्याला तिकडे सोडून. ऱ्या दिवशी अनाथालयातून फोन आला..कि "आपकी cat कि death हो गायी.." . एका अर्थी बरे वाटले कि ते मांजर त्रासातून सुटले..वाईट पण वाटले..आणि आज पण लिहिताना वाटते आहे.

मी अमेरिकेत हरवते तेव्हा....  

Posted by वृषाली in



ऑक्टोबर २००८ ची गोष्ट. माझे सासू-सासरे आले होते. त्यांना न्यूयोर्क आणि naigara दाखवायला अमेरिकेच्या पूर्वेकडे गेलो. आम्ही राहायला पश्चिमे कडे . पहिल्या दिवशीचीच गोष्ट.

आम्ही सचिन(माझा नवरा)च्या मित्राकडे राहिलो होतो new jersy मध्ये. तिकडून ट्रेनने न्यूयॉर्कला सकाळी ९ ला बाहेर पडलो. दिवसभर भटक भटक भटकलो. न्यूयॉर्क मध्ये खूप चालावे लागते.चालायची सवय नसल्यामुळे खूप खूप थकून गेलो. जीवाची मुंबई म्हणतात तसे जीवाचे न्यूयॉर्क करून झाले. आणि रात्री ११-१२ च्या सुमारास पुन्हा new jersy कडे प्रयाण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी ४ ला उठून आवरून पुन्हा न्यूयोर्क कडे जायचे होते "statue of liberty" पाहायला. सकाळी लवकर गेले कि statue of liberty च्या वर पर्येंत जाता येते म्हणून ही सारी धावपळ. तर झाले असे आम्ही रात्री ट्रेन मध्ये बसलो ११-१२ च्या सुमारास आणि स्टेशन आले जिथे आम्हाला उतरायचे होते. सचिन, सासूबाई, सासरे उतरले आणि मी उतरणार तितक्यात ट्रेनचे दार बंद झाले आणि सचिन हताश होऊन बघत होता आणि मी ट्रेन मधून पुढे पण गेले. आधी एकदम भीती वाटली आणि मग दिल चाहता हैं मधला scene आठवला...प्रीती झिंटा आणि आमीर खान यांची पण अशीच चुकामुक होते. पण नंतर लगेच भानावर आले अणि पुन्हा खूप भीती वाटली कारण पैसे नव्हते , क्रेडीट कार्ड नव्हते , पास नव्हता ट्रेनचा. पण त्यावेळी मोबाइल फोनचा खरा उपयोग लक्षात आला. लगेच सचिनला फ़ोन केला पण आउट ऑफ़ कवरेज. ट्रेन मधून उतरायच्या आधी सचिनने मला त्याच्या मित्राचा फ़ोन नंबर दिला होता(जो आम्हाला घ्यायला येणार होता स्टेशन वर )कारण mobile ची battery low होत होती. काय नशीब होते माझे!!! तो पर्येंत मी पुढच्या stop ला पोहचले होते. तिकडे मी एक मुलीला विचारले कि मी काय करू आता? माझ्याकडे काही नाही आहे तर. ती शहाणी म्हणे कि हीच ट्रेन return जाते. मग मी बसून राहिले ट्रेन मध्येच. पण नंतर मला एका कल्लू ने सांगितले कि तू ट्रेन च्या conductor ला भेट आणि सांग त्याला कि असे असे झाले आहे. तो मदत करेल तुला. मग conductor ला सांगितले कि असे असे झाले आहे...त्याने काहीही न विचारता , काहीही विचार न करता मला 2nd floor ला नेले आणि दुसऱ्या ट्रेन मध्ये बसवून दिले..हुश वाटले..हे सगाळे होईपर्येंत सचिनला(मित्राच्या mobile वर ) फोने करून गर्वाने सांगितले कि तुम्ही येऊ नका मला घ्यायला,मीच येते आहे :) सोय केली आहे मी माझी :) मग काय स्वतःचा खूप गर्व वाटला कारण पहिल्यांदाच असे काही तरी धाडस केले होते..वेळ रात्रीची १२ ची,नवीन जागा, नवीन लोक ..पुण्यात काय कधी पण कुठेही जाऊ शकतो पण अश्या ठिकाणी..अजूनही विचार केला तरी काटा येतो अंगावर, स्वतःचेच कौतुक वाटते :) एकदाची ट्रेन मध्ये बसले आणि ज्या स्टेशन वर चुकामुक झाली होती तिकडे गेले पुन्हा.

सगळ्यांनाच मला पाहून आनंद झाला :)