20
Feb
'चोरट' मांजर
अमेरिकेतल्या एका गावी रोज चोर्या होत होत्या आणि त्या सुद्धा विचित्र. कधी टॉवेल कधी हातमोजे कधी लहान मुलांची खेळणी.
एक दिवस एका माणसाने ठरवले की आपण चोरून वीडियोशूटिंग करायचे आणि पाहायचे कोण ही चोरी करते आहे..वीडियो कॅमेरा लावण्यात आला. दुसर्या दिवशी जेव्हा तो वीडियो पाहण्यात आला तेव्हा सगळ्याना भयंकर नवल वाटले..कारण चोरी करणारे दुसरे तिसरे कोणी नसून..एक मांजर होते..
ते मांजर रोज रात्र झाली कि घराबाहेर पडायचे..ज्यांनी कोणी बाहेर त्यांच्या वस्तू ठेवल्या असतील त्या वस्तू घेऊन आणून मालकाच्या घरासमोर आणून ठेवायचे..मग ती वस्तू त्याच्या वजनापेक्षा जड पण असली तरी चालेल..किंवा आकारापेक्षा मोठी असली तरी चालेल आणि त्याचा मालकाला काही उपयोग नसला तरी चालेल..त्या मालकाने अगदी कौतुकाने..एक वेगळी खोली केली आहे आणि त्यात मांजराने चोरून आणलेल्या सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत..मांजराने आत्तापार्येंत ३ वर्षात ६०० गोष्टी चोरल्या आहेत..आहे कि नाही विचित्र मांजर..म्हणूनच मला आवडतात मांजरे.
video साठी इथे क्लिक करा
This entry was posted
on Sunday, February 20, 2011
at Sunday, February 20, 2011
and is filed under
manjar
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.
Post a Comment