मेथीची भाजी
आज खूप दिवसांनी मी मेथीची भाजी आणि पालकाची ताकातली भाजी खाल्ली. आता लोकांना असा प्रश्न पडेल कि त्यात इतका आनंद का झाला हिला? आमच्याकडे मेथी हि फक्त गुरुवारीच मिळते. इतर दिवशी खूप क्वचित "भाग्य " असेल तर मेथी मिळते. मी आज बरोबर १ वर्षाने मेथीची भाजी खाल्ली म्हणून हा मला इतका आनंद झाला आहे. मागच्या वर्षी भारत भेटीत शेवटची मेथी खाल्ली होती.
मागच्या शनिवारी मी भाजी आणायला गेले होते. शनिवार होता त्यामुळे मेथी असेल असे अजिबात वाटले नाही आणि मेथी दिसली. इतका आनंद झाला. माझी एक मैत्रीण आहे तिने मला आधीच सांगून ठेवले होते कि मेथी दिसली तर माझ्यासाठी घेऊन ठेव. लगेच तिला फोने केला. तिला पण शनिवारी मेथी आहे हे एकून आश्चर्य वाटले आणि ३-४ जुड्या घेऊन ठेव असे सांगितले.
कधी भारतात असताना मेथी असो-नसो कधीच काही वाटले नाही..पण अमेरिकेत आल्यापासून मेथीची पण आठवण येते.
आज खूप दिवसांनी गरम गरम पोळ्या पण खाल्ल्या. गरम फुलक्या ,मेथीची भाजी, ताकातली दाणे घालून केलेली पालक भाजी. व्हा व्हा !! आत्मा तृप्त झाला आज आमचा!!(सचिन आणि मी)
माझा आनंद व्यक्त करायचा होता . म्हणून हा ब्लॉग. फेसबुक वर स्टेटस लिहिणार होते पण तिथली जागा कमी पडली असती मला.