Showing posts with label rescue. Show all posts

आमचा काळू  

Posted by वृषाली in ,


मला लहानपानापासूनच मांजरे फार आवडतात..ती आवड आईचीच आली आहे. माझ्या आजोबांना आवडायची नाहीत मांजरे ,मला म्हणायचे कि पाठीवर घेऊन फिरत जा....
माझे लग्न झाले आणि योगायोगाने माझ्या सासरचे "मांजर वेडे" निघाले..दोन्ही घरात मांजरांच्या histories आहेत. इथे मी सध्या एका प्राण्यांच्या अनाथालायत स्वयंसेवक म्हणून जाते आहे. तिथे भरपूर मांजरे भेटतात. एका वेळी २०-२५ मांजरे..म्हणजे माझी दिवाळीच होते :)
तिथून आम्ही एक मांजर घरी आणले आहे..पूर्ण काळ्या रंगाचे आहे . म्हणून आम्ही त्याला "काळू" असे नाव दिले आहे. पूर्ण काळा आणि हिरवे डोळे. पहिल्यांना पाहिल्यावर थोडा आगाऊ वाटतो.पण आता १ महिना त्याच्याबरोबर राहिल्यावर कळले मला कि तो आगाऊ नाही आहे.एकदम प्रेमळ आहे.थोडा सुधा त्याला त्याच्या सौंदर्याचा गर्व नाही.चालताना मस्त ऐटीत चालतो.त्याची शेपटी नेहमीच वरती असते,आम्ही त्याला झेंडा म्हणतो.तो इतका अवाढव्य हे कि बस.. तुम्ही फोटो पहालच त्याचा :)
तो आल्यापासून मला मस्त सोबत मिळाली आहे. दिवसभर माझ्याबरोबर असतो.मी जिथे जाइन तिथे तो येतो.सकाळी उशिरा उठले तरी माझ्या शेजारी शांतपणे झोपून राहतो.कधी कधी भूक असह्य झाली तर उठवतो. नाही तर मी उठले कि मला मस्त good morning करतो,मला अंग घासून. मग आधी त्याला खायला द्यायचे नाही तर तुम्हाला तुमचे एक काम नाही करून देणार..त्याला खायला द्यायचे आणि मग आपली कामे करायची. मग खाउन झाले कि बाल्कनी जवळ जाऊन ओरडत राहतो. कारण सकाळ आणि संध्याकाळी त्याची ठरलेली वेळ असते..बाल्कनीमध्ये timepass करायची. मस्त बसतो बाल्कनीमध्ये आणि टेहळणी करतो.तो बाहेर असताना बाल्कनीचे दार नाही लावायचे...त्याला खूप insecure वाटते. मग थोडा वेळ बसतो आणि उन्ह वाढायला लागले कि बरोबर आत येतो..आधीच काळा आणि जाड केस..किती उकडत असेल बिचाऱ्याला. कधी कधी त्याला मनात नसताना आत आणले कि खूप चिडतो. जोरात आत चालत येतो आणि टेबलवर जोरात उडी मारून पसरतो आणि मी चिडलो आहे असे दाखवतो. भारतात होते तेव्हा बरीच मांजरे पहिली पण अश्या भावना असेलेल मांजर पहिल्यांदाच पाहते आहे. खूप मूडी पण आहे.मूड असेल तर खेळणार,लाड करून घेणार नाही.तो जेव्हा झोपलेला असतो तेव्हा त्याला हात लावायचा कि इतका गोड ओरडतो आणि म्हणतो "मी झोपलो आहे ना दिसत नाही ". अगदी माणसासारखा झोपलेला असतो रात्रभर.
तो खूप famous पण झाला आहे. मला सगळ्या मैत्रिणी विचारतात काळू कसा आहे ? मला bye करताना न विसरता त्याला पण bye करतात.
कधी कधी विचार करते lucky मांजर आहे. आमच्या इथे एक संस्था आहे . तिथे खूप मांजरे रोज सोडली जातात आणि ते लोक २४ तास वाट पाहतात आणि त्यांना मारून टाकतात.कारण त्याच्या कडे रोज शेकडोने मांजरे येतात. "Jan 09 to march 09 " या काळात ५१,००० मांजरे आणि कुत्री आली आहेत तिथे. तिकडूनच मी जिथे काम करते ती संस्था मांजरे आणतात. त्यांना "save from kiil list " म्हणतात. तर आमचा काळू पण तिथूनच आणला आहे मागच्या वर्षी. तिकडे तो एका छोट्या पिंजरा मध्ये बंद होता. विचार केला तरी वाईट वाटते.
तर असा हा आमचा काळू..फुल entertainment आहे. खूप प्रेमळ,गोड...